तलाठी कार्यालयात जाऊन ७/१२ काढायला अख्खा दिवस जातो, हे आपल्याला माहीत आहे. रांगेत उभं राहणं, हेलपाटे मारणं — हा त्रास आता संपला. Digital satbara डाउनलोड करण्याची सोय आता मोबाईलवरच उपलब्ध आहे. फक्त १५ रुपयांत, घरबसल्या, ५ मिनिटांत तुमचा MahaBhulekh Digital 7/12 आणि ८-अ मिळेल. या लेखात संपूर्ण प्रोसेस स्टेप-बाय-स्टेप बघू.
Digital Satbara: ७ आणि १२ हे दोन वेगळे दस्तऐवज (Documents) आहेत का?
अनेक लोकांना वाटते की ७/१२ हा एकच उतारा आहे, पण प्रत्यक्षात ७ आणि १२ हे दोन संपूर्णपणे वेगळे दस्तऐवज (Documents) आहेत, जे एकत्र जोडले जातात.
- गाव नमुना ७ (Form 7): या दस्तऐवजात जमिनीची मालकी कोणाची आहे, त्यावरील कायदेशीर हक्क आणि कर्जाचा बोजा याची माहिती असते.
- गाव नमुना १२ (Form 12): या दस्तऐवजात जमिनीमध्ये कोणते पीक घेतले जाते, पिकाचा प्रकार आणि शेतीची पद्धत याची नोंद असते.
शेतकरी आणि जमीन मालकांसाठी हे दोन्ही नमुने अत्यंत महत्त्वाचे आहेत. सध्या MahaBhulekh Portal वरून तुम्ही अधिकृत Digital Satbara अवघ्या काही मिनिटांत ऑनलाईन सातबारा उतारा डाऊनलोड करू शकता. हा Digital Sign असलेला उतारा सर्व प्रकारच्या शासकीय कामांसाठी १००% वैध मानला जाते. MahaBhulekh Portal काय आहे आणि काय पद्धती राहील ते बघूया.
MahaBhulekh म्हणजे काय?
MahaBhulekh हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत Digital Portal आहे. या पोर्टलवरून तुम्ही पुढील जमीन नोंदी मिळवू शकता:
- 7/12 उतारा
- 8-A गाव नमुना
- मालमत्ता नकाशा
- Land map bhunakasha (जमिनीचा नकाशा)
- फेरफार माहिती
हे पोर्टल 100% सुरक्षित व सरकारी अधिकृत आहे.

हे पण वाचा :- सरकारी कार्यालयात चकरा न मारता मोबाइल वर गट नंबर टाकून आपल्या शेत जमिनीचा नकाशा 2 मिनटांत मिळवा Land Map BhuNakasha
Digital Satbara (7/12) आणि गाव नमुना 8-A का महत्वाचे आहेत?
- शेतजमीन मालकीचा पुरावा
- बँक कर्जासाठी आवश्यक
- सरकारी योजनांसाठी आवश्यक
- जमीन व्यवहारासाठी अनिवार्य
- उत्पन्न नोंदीचे दस्तऐवज
महाभूमीने हे दस्तऐवज मिळवणे अतिशय सोपे केले आहे.
Digital 7/12 फक्त 15 रुपयांत आणि गाव नमुना 8-A मिळवायचे कसे?
Step 1: Mahabhumi पोर्टल उघडा
आपल्या मोबाईलवरून Mahabhulekh अधिकृत संकेतस्थळ उघडा.
Step 2: आपला जिल्हा निवडा
ज्या जिल्ह्यात जमीन आहे तो जिल्हा निवडा.
Step 3: 7/12 किंवा 8-A निवडा
- 7/12 उतारा
- गाव नमुना 8-A
यापैकी हवा तो पर्याय निवडा.
Step 4: तपशील भरा
- गट क्रमांक
- सर्व्हे नंबर
- मालकाचे नाव
यापैकी कोणत्याही माध्यमातून शोध घेऊ शकता.
Step 5: प्रीव्ह्यू तपासा
तुमच्या जमिनीची माहिती योग्य दिसत आहे का ते पाहा.
Step 6: फक्त ₹15 शुल्क भरा
UPI, Debit Card किंवा Net Banking ने पेमेंट करा.
Step 7: डाउनलोड करा
पेमेंट यशस्वी झाल्यावर तुमचा Mahabhulekh 7/12 Online आणि 8-A PDF त्वरित डाउनलोड होईल.
संपूर्ण प्रक्रिया 2 मिनिटांपेक्षा कमी वेळा ऑनलाइन 7/12 Digital Sign करून मिळतो.
Land map bhunakasha कसा मिळवायचा?
महाभूमीवर तुम्हाला जमिनीचा नकाशा म्हणजेच Land map bhunakasha ऑनलाइन सहज उपलब्ध आहे. हे नकाशा मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त:
- जिल्हा
- तालुका
- गट नंबर
भरावा लागतो आणि तितक्यात Land map Bhunakasha स्क्रीनवर दिसतो.
हा नकाशा शेतमोजणी, कर्ज अर्ज, जमीन व्यवहार आणि इतर अनेक सरकारी कामांसाठी उपयोगी असतो.
या प्रक्रियेचे फायदे
- सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही
- वेळ आणि पैसे दोन्हीची बचत
- अधिकृत सरकारी नोंदी घरबसल्या
- Land map Bhunakasha PDF स्वरूपात कायम उपलब्ध
- सुरक्षित, अचूक आणि अपडेटेड माहिती
महत्वाची सूचना
- नेहमी अधिकृत महाभूमी पोर्टलच वापरा
- चुकीचे पेमेंट लिंक वापरू नका
- चुकीचे सर्व्हे नंबर टाकू नका
- डाउनलोड केलेले दस्तऐवज सुरक्षित ठेवा
Q1. How to get digital satbara online?
डिजिटल स्वाक्षरी असलेला उतारा मिळवण्यासाठी महाभूलेखच्या अधिकृत संकेतस्थळाला (digitalsatbara.mahabhumi.gov.in) भेट द्या, नवीन रजिस्ट्रेशन किंवा OTP द्वारे लॉगिन करा आणि ₹१५ शुल्क भरून Digital Satbara डाऊनलोड करा.
Q2. Is digitally signed 7/12 valid for bank loans?
होय, ऑनलाईन डाऊनलोड केलेल्या Digital Sign ७/१२ उताऱ्यावर तलाठ्याच्या सही-शिक्याची गरज नसते. हा उतारा बँक कर्ज, खरेदी-विक्री आणि सर्व कायदेशीर कामांसाठी पूर्णपणे वैध आहे.
निष्कर्ष
Mahabhumi पोर्टलमुळे जमीन नोंदी मिळवणे आता पूर्वीपेक्षा खूप सोपे आणि जलद झाले आहे. Digital Satbara सुविधेमुळे फक्त १५ रुपयांत आणि अवघ्या २ मिनिटांत तुम्ही Mahabhulekh ७/१२ आणि गाव नमुना ८-अ थेट मोबाईलवर डाउनलोड करू शकता. QR कोड असलेला हा digital-satbara उतारा बँक, कोर्ट आणि सरकारी कार्यालयांमध्ये सहज मान्य होतो, त्यामुळे तलाठी कार्यालयाचे हेलपाटे आणि रांगेतला वेळ पूर्णपणे वाचतो. शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त असल्याने, गट नंबर आणि खातेदाराचे नाव नीट तपासून एकदा ही सुविधा जरूर वापरून बघा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा लेख तुमच्या WhatsApp ग्रुपवर नक्की share करा, जेणेकरून गावातल्या इतरांनाही याचा फायदा होईल.

मी तुषार भगत. मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती आणि सरकारी नोकरीसंबंधित अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. माझा उद्देश गोर-गरीब कामगार , सामान्य नागरिक आणि शेतकरी यांना त्यांच्या हक्काच्या सरकारी योजनांची माहिती सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे हा आहे.Yojanawadi.com या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, समजण्यास सोप्या अशा स्वरूपात मिळतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवण्यासाठी योग्य माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे.