WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर 3000 चा हप्ता कधी मिळणार? KYC न केल्यास काय परिणाम होईल? Ladki Bahin Yojna e-KYC Update 2025

महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी चालवली जाणारी Ladki Bahin Yojna पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हप्ते वेळेवर मिळत नसल्यामुळे महिलांमध्ये चिंता वाढली आहे.

राज्यातील ‘लाडकी बहिण ‘ योजनेतील लाभार्थीना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी एक मोठा भेट मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी डिसेंबर महिन्यात एक गिफ्ट देण्याची तयारी करत आहे.डिसेंबर महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन हप्ते नूतन वर नवीन वर्षाच्या निमित्ताने ही सरकार नोव्हेंबर व डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्रित देण्यात येईल त्यामुळे लाडकी बहीण तीन हजार मिळण्याची दाट शक्यता आहे , म्हणजेच त्यामुळे त्या महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये न जाता ३००० रुपये जमा होऊ शकतात.

महिलांच्या मनात प्रश्न आहे:

“पैसे कधी येणार?”

  • ज्या महिलांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांच्याकडे 10 दिवसांपेक्षा कमी दिवस उरले आहेत.
  • महिला आणि बालविकास मंत्री तसेच श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की:

योजनेत नोंदणी केलेल्या सर्व महिलांनी 31 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी e-KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. तारिख वाढू पण शकते .e-KYC न केल्यास मासिक ₹1,500 हप्ता थांबवला जाईल

डिसेंबरमध्ये महिलांना ₹1,500 की ₹3,000 मिळणार? कधी मिळणार?

महाराष्ट्र सरकार लाडके बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्यात येईल अशी महाराष्ट्र सरकारची शक्यता आहे आणि तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे आणि डिसेंबरचे पंधराशे दोन्ही मिळून एकत्र तीन हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे 2026 च्या नूतन वर्षासाठी सरकार तुम्हाला एक नवीन वर्षाची भेट म्हणून तीन हजार रुपये देण्याची शक्यता दाखवत आहे तर लगेच तुम्ही केवायसी करून घ्या केवायसी नाही केली तर काय परिणाम होईल आणि केवायसी कशी करावी हे खालील प्रमाणे मी दिलेले आहे माहिती सविस्तर वाचून लाभ मिळवा.

E-KYC न केल्यास काय परिणाम होईल?

  1. हप्ता मिळणार नाही: नोव्हेंबर / डिसेंबर महिन्याचा ₹1,500/₹3,000 हप्ता थांबवला जाऊ शकतो.
  2. अर्ज अपूर्ण मानले जाईल: भविष्यातील हप्त्यांसाठी अर्ज सिस्टममध्ये अपूर्ण मानला जाईल.
  3. सत्यापन विलंब: KYC न केल्यास पुढील हप्त्यांसाठी सत्यापन करावे लागेल, ज्यामुळे पैसे मिळण्यात विलंब होईल.

e-KYC प्रक्रिया – स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक

  1. अधिकृत पोर्टलला भेट द्या: ladakibahin.maharashtra.gov.in
  2. होमपेजवरील e-KYC बॅनरवर क्लिक करा – e-KYC फॉर्म उघडेल.
  3. फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  4. ओटीपी पाठवा वर क्लिक करा, तुमच्या आधार-लिंक्ड मोबाइलवर येणारा OTP प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  5. जर तुमचे नाव पात्र यादीत असेल, पुढील पायरी उघडेल.
  6. पती/वडिलांचा आधार क्रमांक प्रविष्ट करा, ओटीपी प्राप्त करून सबमिट करा.
  7. जात श्रेणी निवडा आणि दोन घोषणा स्वीकारा:
  • कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरी किंवा पेन्शनमध्ये नाही.
  • कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.
  1. सबमिट करा – स्क्रीनवर संदेश दिसेल:

“यशस्वी – तुमचे e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.”

टीप: दरवर्षी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे, जे फसवणूक टाळण्यासाठी आणि डेटा अपडेट ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

हप्ता मिळवण्यासाठी महत्वाचे टिप्स

  1. बँक खाते अद्ययावत ठेवा: चुकीचे खाते असल्यास हप्ता जमा होणार नाही.
  2. अर्ज पूर्ण करा: सर्व माहिती योग्य व अपलोड केलेली असणे आवश्यक.
  3. अधिकृत वेबसाइट तपासा: ladakibahin.maharashtra.gov.in
  4. तालुका/जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधा: अडचणी असल्यास त्वरित संपर्क करा.

सारांश

  • ladki bahin yojna अंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 हप्ता मिळवण्यासाठी e-KYC अनिवार्य आहे.
  • e-KYC न केल्यास मासिक ₹1,500/₹3,000 हप्ता थांबवला जाईल.
  • लाभार्थींनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • अर्जाची माहिती, बँक खाते आणि दस्तऐवज नेहमी अद्ययावत ठेवा.

Leave a Comment