केंद्र सरकारच्या Senior Citizen Saving Scheme (SCSS) आणि National Savings Certificate (NSC) या योजना यासाठी लोकप्रिय पर्याय आहेत. पण, तुमच्या गरजा, वयोमर्यादा आणि उत्पन्नाच्या अपेक्षा यावर आधारित कोणती योजना योग्य ठरेल? निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी योग्य गुंतवणूक योजना निवडणे अत्यावश्यक असते. म्हणून आज आपण या ब्लॉग मार्फत SCSS vs NSC काय आहे आणि आपल्यासाठी कस फायदेशीर आहे ते सविस्तर पणे बघूया .

Senior Citizen Saving Scheme (SCSS) म्हणजे काय?

SCSS ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे, जी फक्त निवृत्त व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. ही योजना सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय विश्वासार्ह मानली जाते. 60 वर्षांवरील किंवा 55 वर्षांवरील निवृत्त सरकारी कर्मचारी योग्य असणारी योजना आहे त्याच लाभ आवश्य घेतला पाहिजे जेणे करून निवृत्त सरकारी कर्मचारी आणि इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली Senior Citizen Saving Schemes आहे.

Senior Citizen Saving Scheme (SCSS) वैशिष्ट्ये:

  • पात्रता: 60 वर्षांवरील किंवा 55 वर्षांवरील निवृत्त सरकारी कर्मचारी
  • कालावधी: 5 वर्षे (3 वर्षांनी वाढवता येते)
  • कमीतकमी गुंतवणूक: ₹1,000
  • कमाल गुंतवणूक: ₹30 लाख (2023 पासून सुधारित)
  • सध्याचा व्याजदर: 8.2% (2025 साठी)
  • व्याज वितरण: त्रैमासिक खात्यात जमा
  • कर सवलत: IT Act, 80C अंतर्गत
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

👉 Senior Citizen Saving Scheme (SCSS) कॅल्क्युलेटर: Groww SCSS Calculator

National Savings Certificate (NSC) म्हणजे काय?

NSC ही भारत सरकारची एक सुरक्षित बचत योजना आहे, जी कोणत्याही वयोगटासाठी खुली आहे. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य मानली जाते.

वैशिष्ट्ये:

  • पात्रता: कोणतीही भारतीय नागरिक
  • कालावधी: 5 वर्षे
  • कमीतकमी गुंतवणूक: ₹1,000
  • व्याजदर: 7.7% (2025 साठी)
  • व्याज वितरण: maturity वेळी एकरकमी
  • कर सवलत: 80C अंतर्गत ₹1.5 लाखपर्यंत सवलत

👉 अधिकृत माहिती: India Post NSC Details

SCSS vs NSC काय फरक आहे ते बघूया

घटकSenior Citizen Saving Scheme (SCSS)NSC
पात्रता60 वर्षांवरील निवृत्त नागरिकसर्व भारतीय नागरिक
व्याजदर8.2%7.7%
व्याज पेमेंटत्रैमासिकएकरकमी (5 वर्षांनी)
कालावधी5 वर्षे (+3 वर्ष वाढवता येतो)5 वर्षे
कमाल गुंतवणूक₹30 लाखमर्यादा नाही
कर सवलत80C अंतर्गत ₹1.5 लाख80C अंतर्गत ₹1.5 लाख
सुरक्षेचा दर्जाफार उच्चउच्च
Post Office Sukanya Samriddhi Yojana and another post office Schemes SCSS vs NSC
Sukanya Samriddhi Yojana vs SCSS vs NSC कोणती योजना कोणासाठी योग्य आहे?

SCSS vs NSC कोणासाठी कोणती योजना?

SCSS जेष्ठ नागरिकांसाठी योजना राबविण्यात येत आहे

  • वय 60 किंवा अधिक आहे
  • नियमित उत्पन्नाची गरज आहे
  • सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा आहे
  • जास्त व्याजदर हवा आहे

NSC 18 वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे

  • दीर्घकालीन गुंतवणुकीस प्राधान्य देत आहात
  • एकरकमी रक्कम हवी आहे
  • compound interest चा फायदा हवा आहे
  • वय 60 पेक्षा कमी आहे

व्याजावर आधारित तुलना:

SCSS:

  • ₹30 लाख गुंतवणुकीवर 8.2% व्याजाने वार्षिक उत्पन्न ₹2,46,000
  • त्रैमासिक ₹61,500 खात्यात जमा

NSC:

  • ₹30 लाख गुंतवणुकीवर 5 वर्षांनंतर maturity रक्कम ₹43.37 लाख (compound interest)

SCSS चे तोटे:

  • लवकर पैसे काढल्यास दंड आकारला जातो
  • व्याज reinvest होत नाही, खातेधारकाला ते स्वतः गुंतवावे लागते
  • गुंतवणुकीवर मर्यादा आहे (₹30 लाख)

👉 अधिक माहितीसाठी: Income Tax SCSS Section

निष्कर्ष:

जर तुम्ही निवृत्त असाल आणि नियमित उत्पन्न हवे असेल, तर Senior Citizen Saving Scheme ही सर्वोत्तम योजना आहे. मात्र, दीर्घकालीन एकरकमी उत्पन्नासाठी आणि compound interest चा फायदा घेण्यासाठी NSC हा एक चांगला पर्याय ठरतो. SCSS vs NSC या दोन्ही पण वेगवेगळे योजना आहेत एक ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली योजना आणि दुसरी 18 वर्षे पूर्ण असलेले कोणतेही भारतीय नागरिक त्यांच्यासाठी असलेली ही योजना आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला सविस्तरपणे माहिती दिलेली आहे तरी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि ब्लॉक बद्दल काही पण अडचण असल्यास तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता नाहीतर डायरेक्ट इन्क्वायरी करू शकता अधिकृत वेबसाईटवर.

NSC Interest दरमहा किंवा त्रैमासिक मिळते का?

नाही, NSC interest rate दरवर्षी संकलित होत जाते आणि शेवटी NSC maturity वेळी एकरकमी रक्कम मिळते. यामुळे compound interest चा फायदा मिळतो.

SCSS मध्ये premature withdrawal शक्य आहे का?

हो, SCSS मध्ये मुदतीपूर्वी पैसे काढणे शक्य आहे, परंतु त्यासाठी काही टक्के दंड आकारला जातो:
1 वर्षानंतर पण 2 वर्षांपूर्वी: 1.5% दंड
2 वर्षांनंतर: 1% दंड

SCSS vs NSC दोन्हीमध्ये एकाचवेळी गुंतवणूक करू शकतो का?

होय, तुम्ही दोन्ही योजनांमध्ये एकत्र गुंतवणूक करू शकता आणि विविध फायदे घेऊ शकता. हे तुम्हाला diversified सुरक्षित पोर्टफोलिओ तयार करायला मदत करतं.

SCSS vs NSC कोण निवडावं जर मी सीनियर सिटिझन नाही?

जर वय 60 पेक्षा कमी असेल, तर NSC हा योग्य पर्याय ठरतो. SCSS फक्त सीनियर सिटिझन किंवा VRS घेतलेल्यांसाठी असते.

VRS आणि रिटायरमेंट मध्ये काय फरक आहे?

VRS ही स्वेच्छेने घेण्यात येणारी निवृत्ती आहे, जी ठराविक अटी पूर्ण केल्यावर घेतली जाते. सामान्य निवृत्ती ही वयोमर्यादा पूर्ण झाल्यावर होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment