APAAR ID- केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी १,२८,६५० कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. अशी माहिती आम्हाला टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम या नामांकित न्यूज चैनल द्वारे मिळाली आहे तरी आणि तसेच या निधीचा वापर शाळा शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधन क्षेत्रांच्या विकासासाठी आणि सुविधांसाठी केला जाणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगली शैक्षणिक संधी मिळतील.

APAAR ID For Student:-भारत सरकारने “एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळखपत्र” (One Nation One Student ID Card) उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश देशभरातील विद्यार्थ्यांना आता प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार युनिक डिजिटल ओळखपत्र . या योजनेमुळे शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती, परीक्षा निकाल, शिष्यवृत्ती आणि इतर महत्वाच्या दस्तऐवजांची सहजपणे माहिती मिळवता येईल.
One Nation One Student ID – या उपक्रम बद्दल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि इतर शैक्षणिक संस्थांनी याला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक ओळखपत्र म्हणून स्वीकारले आहे.विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या डेटा व्यवस्थापनाला अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता मिळेल. विद्यार्थ्यासाठी 12 अंकी अपार कार्ड (Automated Permanent Academic Account Registry) बनवले जाईल. यामध्ये त्यांच्या १२-अंकी युनिक स्टुडंट आयडेंटिफिकेशन नंबर या युनिक APAAR ID डिजिटल ओळखपत्रामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक माहितीचे संकलन सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने होईल.

भारतातील वन नेशन, वन स्टुडंट आयडी (APAAR ID) बद्दल जाणून घ्या. नोंदणी प्रक्रिया, डाउनलोड करण्याची पद्धत आणि या डिजिटल ओळखपत्राचे फायदे काय आहे हे खालील प्रमाणे सविस्तररित्या जाणून घ्या.
भारताचा शिक्षण क्षेत्र आता वन नेशन, वन स्टुडंट आयडी (APAAR ID) च्या माध्यमातून डिजिटल परिवर्तनाकडे वाटचाल करत आहे. हा युनिक स्टुडंट आयडेंटिफिकेशन नंबर विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा डिजिटल नोंद ठेवतो. तो Academic Bank of Credits (ABC ID) शी जोडलेला आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील प्रगती ट्रॅक करण्यास मदत करतो.
अपार आयडीचे काय फायदे आहे -What is Benefits of Apaar ID One Nation One Student ID
वैशिष्ट्ये | फायदे |
---|---|
युनिक ओळख क्रमांक | प्रत्येक विद्यार्थ्याला १२-अंकी अपार आयडी मिळतो. |
अकॅडमिक क्रेडिट साठवण | Academic Bank of Credits (ABC ID) सह संलग्न. |
सोपे पडताळणी | बनावट प्रमाणपत्रांवर नियंत्रण आणि ओळख तपासणी सहज शक्य. |
डिजिटल दस्तऐवज संग्रह | प्रमाणपत्रे, डिप्लोमा आणि पदवी डिजिटली सेव्ह केली जाते. |
लवचिक शिक्षण प्रणाली | मल्टीपल एंट्री-एग्झिट ऑप्शनसह शिक्षण शक्य. |
सोपे प्रवेश आणि रोजगार संधी | विद्यापीठे आणि नियोक्ते रेकॉर्ड त्वरित पडताळू शकतात. |
विद्यार्थी अपार ओळखपत्र कसे डाउनलोड करावे?(How to download Student Apaar ID Card)
- अपार आयडीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://apaar.education.gov.in
- AADHAAR लिंक केलेला मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा.
- शैक्षणिक माहिती भरा (शाळा/महाविद्यालय नाव, नोंदणी क्रमांक इ.).
- OTP किंवा DigiLocker द्वारे पडताळणी करा.
- अपार आयडी कार्ड डाउनलोड करा PDF स्वरूपात.

वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड म्हणजे काय? What is a one Nation on student Id Card
वन नेशन, वन स्टुडंट आयडी किंवा अपार आयडी हा डिजिटल ओळख क्रमांक आहे, जो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी एकत्र ठेवतो.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत सुरू झालेला हा उपक्रम क्रेडिट ट्रान्सफर, प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे आणि शिक्षणातील फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे.
पात्रता निकष
Eligibility Criteria of Students Apaar Id Card
- भारतातील शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी.
- AADHAAR लिंक केलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक.
- संस्थांनी Academic Bank of Credits (ABC ID) सोबत नोंदणी केलेली असावी.
अपार आयडी कार्ड कसा मिळवायचा? ऑनलाईन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे
How to Get APAAR ID? Online Registration & Required Documents
✔ आधार कार्ड (AADHAAR लिंक मोबाईल क्रमांकासह)
✔ विद्यार्थी नोंदणी क्रमांक
✔ शाळा/महाविद्यालय नाव आणि अभ्यासक्रमाची माहिती ya
✔ DigiLocker खाते (पर्यायी, पण शिफारसीय)
अपार आयडी कार्ड ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी करावी? – What is Online Process Of Apaar Id Card
- अपार आयडी नोंदणी पोर्टल उघडा: ABC ID Website
- ‘विद्यार्थी नोंदणी’ वर क्लिक करा आणि आधार लिंक मोबाईल नंबर टाका.
- OTP पडताळणी पूर्ण करा.
- शैक्षणिक माहिती प्रविष्ट करा (संस्था नाव, नोंदणी क्रमांक, अभ्यासक्रम).
- DigiLocker द्वारे e-KYC पूर्ण करा.
- फॉर्म सबमिट करा आणि युनिक अपार आयडी मिळवा.
नोंदणी केल्यानंतर APAAR ID कशी डाउनलोड करता येते?
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, अधिकृत वेबसाइटवर (उदा. apaar.gov.in) लॉगिन करा.

तुमचे नोंदणी केलेले मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडी वापरून लॉगिन करा.
“डाउनलोड APAAR ID” या पर्यायावर क्लिक करा.
PDF स्वरूपात ID कार्ड डाउनलोड करा आणि आवश्यक असल्यास प्रिंट काढा.
APAAR ID हरवल्यास नवीन ID कशी मिळवावी?
आधीच्या नोंदणीचा तपशील आणि ओळखपत्र वापरून अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा.“Forgot APAAR ID” किंवा “Retrieve ID” या पर्यायावर क्लिक करा.आवश्यक तपशील भरा आणि OTP द्वारे ओळख प्रमाणित करा.यानंतर, हरवलेली ID पुन्हा डाउनलोड करता येईल.
निष्कर्ष
वन नेशन, वन स्टुडंट आयडी (APAAR ID) ही शिक्षण क्षेत्रातील मोठी क्रांती आहे. शैक्षणिक प्रवास ट्रॅक करणे, क्रेडिट ट्रान्सफर आणि फसवणूक टाळण्यासाठी याचा मोठा उपयोग आहे.
तुम्ही विद्यार्थी, पालक किंवा शिक्षक असाल, तर आजच अपार आयडी नोंदणी करून त्याचे फायदे घ्या.
🔗 नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ: https://apaar.education.gov.in 🎓
महत्त्वाचे स्रोत आणि संदर्भ: Important Resource and Reference
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) – https://www.education.gov.in
- Academic Bank of Credits (ABC ID) पोर्टल – https://www.abc.gov.in
- नवीन शैक्षणिक धोरण संबंधित बातम्या – https://timesofindia.indiatimes.com
One Nation One Student ID (APAAR ID Card) चे फायदे काय आहेत?
विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड एका ठिकाणी सुरक्षित ठेवले जातात.
शाळा बदलल्यास किंवा उच्च शिक्षण घेतल्यास डेटा आपोआप अपडेट होतो.
शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा आणि इतर शासकीय योजनांसाठी एकाच ID द्वारे प्रवेश मिळतो.
वेळ आणि कागदपत्रांची बचत होते, तसेच पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढते.
Student ID Card चा उपयोग काय आहे?
Student ID Card चा उपयोग ओळखपत्र म्हणून शाळा, महाविद्यालये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये करता येतो.शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया आणि विविध शैक्षणिक योजनांसाठी आवश्यक आहे.APAAR ID Card वापरून विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ, शैक्षणिक माहिती आणि डिजिटल सेवांना प्रवेश मिळतो.

मी तुषार भगत, मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय योजना, लाभ व माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanawadi.com या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील — कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!