MAHABOCW म्हणजे “Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board” ही बांधकाम कामगारांसाठी राबवली जाणारी कल्याणकारी संस्था आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे ही संस्था कामगारांच्या आरोग्य, शिक्षण, आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी अनेक योजना चालवते.
MAHABOCW Health Scheme 2025 या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी दोन प्रमुख प्रकारच्या वैद्यकीय मदतीची तरतूद आहे:
- डिलिव्हरीसाठी आर्थिक सहाय्यता
- गंभीर आजाराच्या उपचारासाठी आर्थिक मदत
डिलिव्हरीसाठी किती मदत मिळते?
9 मध्ये नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांना डिलिव्हरीसाठी सरकारकडून खालीलप्रमाणे मदत मिळते:
- सामान्य (Normal) डिलिव्हरीसाठी ₹15,000
- शस्त्रक्रियेच्या (C-Section) डिलिव्हरीसाठी ₹20,000
ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते. डिलिव्हरीनंतरची कागदपत्रे सादर केल्यानंतरच ही मदत मिळते.
गंभीर आजारासाठी कोणती मदत आहे?
कामगार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला जर खालीलपैकी गंभीर आजार झाला असेल तर BOCW बोर्ड त्यासाठी ₹1,00,000 पर्यंतची आर्थिक मदत उपलब्ध करून देतो:
- हृदयविकार व शस्त्रक्रिया
- कॅन्सर
- मूत्रपिंड निकामी होणे
- मेंदूशी संबंधित आजार
- अपघातजन्य गंभीर दुखापत
- इतर आयसीयूसह उपचार लागणारे आजार
MAHABOCW Health Scheme 2025 या योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिक कारणांमुळे उपचार थांबू नयेत आणि वेळेत मदत मिळावी.

पात्रता अटी
- अर्जदार महाराष्ट्र BOCW मध्ये वैध नोंदणीकृत असावा
- अर्जदाराने मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे
- Smart Card आणि नोंदणी क्रमांक अनिवार्य
- डिलिव्हरीसाठी लाभ घेणाऱ्या महिला विवाहित असाव्यात
- गंभीर आजारासाठी डॉक्टर व हॉस्पिटलची मान्यताप्राप्त कागदपत्रं आवश्यक
लागणारी कागदपत्रं
- MAHABOCW नोंदणी प्रमाणपत्र आणि Smart Card
- आधार कार्ड व बँक पासबुक (स्वत:च्या नावे)
- डिलिव्हरीसाठी विवाह प्रमाणपत्र
- हॉस्पिटल बिल, डिस्चार्ज रिपोर्ट, मेडिकल सर्टिफिकेट
- पासपोर्ट साईज फोटो
- गंभीर आजारासाठी – संबंधित डॉक्टर व हॉस्पिटलचे मेडिकल सर्टिफिकेट व सल्ला
अर्ज प्रक्रिया
सध्या ही योजना फक्त ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध आहे.
- mahabocw.in वरून संबंधित फॉर्म (H01 – डिलिव्हरीसाठी, H02 – गंभीर आजारासाठी) डाऊनलोड करा
- अर्ज फॉर्म भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कामगार कल्याण कार्यालयात जमा करा
- अर्जाची रीतसर नोंद घेतल्यावर त्याची पावती मिळवावी
- योग्य तपासणीनंतर ३० ते ४५ दिवसांत लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते
योजना 2025 मध्ये सुरू आहे का?
होय. ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये 2025 मध्ये देखील कार्यरत आहे.
mahabocw.in या अधिकृत संकेतस्थळावर ह्या योजनेचे अर्ज फॉर्म आणि मार्गदर्शक तत्त्वे आजही उपलब्ध आहेत.
अनेक महिलांना डिलिव्हरीनंतर मदत मिळालेली आहे आणि गंभीर आजारासाठी देखील मदतीचे प्रकरणे मंजूर झालेली आहेत.
महत्त्वाची सूचना
- अर्ज अपूर्ण असल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास तो नाकारला जाऊ शकतो
- फॉर्म भरताना सर्व डॉक्युमेंट्स अचूक द्यावेत
- एकाच लाभार्थ्यास एकाच प्रकारच्या योजनेचा लाभ एकदाच मिळतो
- रक्कम फक्त लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यातच जमा होते
अर्ज कसा करायचा आणि किती वेळ लागतो?
MAHABOCW Health Scheme साठी अर्ज mahabocw.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा स्थानिक कामगार कल्याण कार्यालयात करता येतो. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर साधारणतः 30 ते 45 दिवसांच्या आत रक्कम थेट खात्यात जमा केली जाते. प्रक्रिया पारदर्शक असून अपडेट्स SMS/E-mail द्वारे मिळतात.
₹1 लाख खर्चासाठी कुठले आजार समाविष्ट आहेत?
MAHABOCW Health Scheme या योजनेत कॅन्सर, हृदयविकार, मेंदूचे आजार, किडनी फेल, मोठ्या शस्त्रक्रिया, अपघातात लागलेली इमर्जन्सी ट्रीटमेंट यांसारखे गंभीर आजार समाविष्ट आहेत. यासाठी तुम्हाला ऑरिजिनल बिल्स आणि हॉस्पिटलच्या अधिकृत कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. सरकारी मदतीचा थेट लाभ बँक खात्यावर मिळतो.
डिलिव्हरीसाठी किती रक्कम मिळते आणि काय प्रक्रिया आहे?
जर बांधकाम महिला कामगाराने डिलिव्हरी केली असेल तर Normal Delivery साठी ₹10,000 आणि Caesarean साठी ₹15,000 इतकी रक्कम सरकारकडून थेट बँक खात्यात जमा होते. यासाठी Discharge Summary, हॉस्पिटलचं बिल, नोंदणी कार्ड आणि बाळाच्या जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता असते. MAHABOCW Health Scheme प्रक्रिया ऑनलाईनही करता येते.
सरकार बांधकाम कामगाराला हॉस्पिटल खर्चात किती मदत करते?
MAHABOCW Health Scheme 2025 अंतर्गत, सरकार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गंभीर आजारांवर उपचारासाठी ₹1 लाखांपर्यंतची थेट आर्थिक मदत देते. खर्चाचं बिल, हॉस्पिटल रिपोर्ट आणि कामगार नोंदणी कार्ड असलं की, पैसे थेट बँकेत. गरीब मजुरासाठी ही योजना खरंच दिलासा देणारी आहे.
बांधकाम महिला कामगाराला डिलिव्हरी खर्चासाठी किती रक्कम मिळते?
जर बांधकाम महिला कामगार असेल तर डिलिव्हरीसाठी सरकारकडून ₹15,000 पर्यंतची रक्कम फ्री मिळते. Normal असेल तर ₹10,000, C-section असेल तर ₹15,000 मिळतात. आधार, discharge summary आणि नोंदणी कार्ड पुरेसं. घरात बाळ, आणि खात्यात सरकारकडून मदत
जर कार्ड हरवलं, तर ते पुन्हा कसं डाऊनलोड करायचं?
तुमचं कार्ड हरवलं तरी टेन्शन नको. तुम्ही mahabocw.in वर जाऊन Bandhkam Kamgar Smart Card Download करू शकता. त्यासाठी Aadhaar नंबर आणि रजिस्ट्रेशन ID लागते. लॉगिन केल्यावर PDF कार्ड लगेच मिळतं – ते डाऊनलोड करून प्रिंट काढता येते. सगळी प्रक्रिया फ्री आहे!
निष्कर्ष
MAHABOCW Health Scheme 2025 ही योजना बांधकाम कामगारांसाठी आरोग्य सुरक्षा देणारी एक ठोस मदत आहे.
डिलिव्हरीसाठी किंवा गंभीर आजाराच्या प्रसंगी मोठा आर्थिक भार उचलण्याची गरज न पडता सरकारकडून मदत मिळवता येते.
जर तुझं Construction worker Smart Card वैध असेल आणि तू पात्र असशील – तर ही मदतीची संधी गमावू नकोस.
आजच फॉर्म भरून तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सरकारी पाठिंबा मिळव.

मी तुषार भगत, मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय योजना, लाभ व माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanawadi.com या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील — कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!