सरकारी योजना जसं की PM Kisan, eShram, LPG Subsidy, Pension, Scholarship यामधील पैसे थेट बँक खात्यात (DBT – Direct Benefit Transfer) जमा होतात.
पण जर बँकेचं Saving Account Dormant (अक्रिय म्हणजे inactive) झालं असेल, तर सरकारकडून पैसे पाठवले गेले तरी ते खात्यात जमा होत नाहीत.
Dormant Account म्हणजे काय?
जर बँक खात्यामध्ये 12 महिने सलग कोणताही व्यवहार (transaction) नसेल, तर ते खातं बँक Dormant किंवा Inactive म्हणून टॅग करते.
काही बँका 24 महिन्यांचं मोजतात – पण बहुतेक बँका 12 महिन्यांचाच नियम पाळतात.
DBT म्हणजे काय?
Direct Benefit Transfer (DBT) म्हणजे सरकारी योजना, सबसिडी, अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा होणे.
हे account जर Dormant असेल, तर DBT प्रणाली ते पैसे पाठवत नाही किंवा पाठवल्यानंतरही rejected होतं.
Dormant Account असल्यास काय होतं?
- DBT पैसे खात्यात येत नाहीत
- पेमेंट Status PFMS वर “Rejected”, “Returned” किंवा “Account inactive” असं दाखवतं
- बँक त्या पेमेंटला accept करत नाही
- सरकारकडून पैसे परत जातात.
Dormant Account Active कसं करायचं?
जर Saving Account अक्रिय (Dormant) झालं असेल, तर ते पुन्हा Active करायला काही स्टेप्स आहेत:
1. स्वतः बँकेत भेट द्या
- आधार कार्ड, PAN कार्ड किंवा KYC डॉक्युमेंट घ्या
- Account Reactivation Request फॉर्म भरा
- एक छोटा व्यवहार (cash deposit किंवा withdrawal) करा.
2. Online सुविधा (काही बँकांमध्ये)
- काही बँका (SBI, HDFC, ICICI) खातं online सुद्धा Reactivate करू देतात.
- त्यासाठी Netbanking लॉगिन करून “Reactivation” किंवा “Service Request” ऑप्शन निवडा.
3. KYC अपडेट करा
- जर KYC जुना असेल तर तो अपडेट करणं आवश्यक असतं.
- मोबाईल नंबर, फोटो, पत्ता यातील बदल असल्यास तेही बँकेत नोंदवा.
खाते Reactivate झाल्यावर DBT परत मिळतो का?
जर सरकारकडून पाठवलेला पैसा bank ने accept न करता परत पाठवला असेल, तर:
- काही योजना (उदा. PM Kisan) त्या पेमेंटची Repayment Retry करतात
- पण बऱ्याच योजनांमध्ये तो पैसा Missed Benefit समजून पुढच्या हप्त्यांतून भरपाई केली जाते
- काही वेळा तुम्हाला manual request द्यावी लागते – eShram, Pension, इ. योजनेसाठी
योजनेचा DBT मिळणे करिता काय करावे?
- बँक खातं Active ठेवावं – दर 6 महिन्यांत एक व्यवहार करा
- खात्यावर मोबाईल नंबर अपडेट ठेवावा
- IFSC कोड किंवा बँक merger बदलल्यास ताबडतोब Portal वर अपडेट करा
- KYC update वेळोवेळी करून ठेवा
- योजना Portal वर तुमचं खातं Aadhar NPCI Seeding आहे का ते तपासा
Account Dormant होऊ नये म्हणून काय करावं?
जर २४ महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार केला नसेल, तर बँक तुझं डॉर्मंट Account म्हणते.पण account चालू ठेवायचं असेल, तर दर काही महिन्यांनी हे साधं-सोपं काम करत जा:
- ₹10-₹100 चं एखादं UPI payment
- ATM withdrawal
- balance check etc
- Passbook update
- Netbanking/ Mobile banking
या छोट्या गोष्टी account चालू ठेवायला पुरेशा आहेत.Account active राहिलं की DBT subsidy, सरकारी योजना, किंवा कोणतीही बँक सुविधा व्यवस्थित मिळत राहते.थोडं लक्ष दिलं, की मोठी अडचण टळते – एवढंच!
1. माझं Account Dormant झालंय का, हे कसं ओळखायचं?
साधं बघायचं, तर तुम्ही गेल्या १२ महिन्यांपासून खात्यात काहीच व्यवहार केला नसेल — म्हणजे पैसे काढणं, जमा करणं, UPI वापरणं, ATM वापरणं — तर बँक तुमचं account dormant करतं. Netbanking किंवा मोबाईल अॅप उघडताना “Account Dormant” असं नोटिफिकेशन येऊ शकतं, किंवा UPI पेमेंट करताना “account inactive” असं एरर दिसेल. काही वेळा बँक थेट SMS/ईमेलनेही कळवते. खातं खरंच dormant आहे की नाही, हे पक्कं तपासायचं असेल तर बँकेच्या कस्टमर केअरला फोन करा किंवा जवळच्या शाखेत जाऊन विचारलं तरी चालेल. थोडंसं KYC अपडेट करून, अगदी ₹१ चा व्यवहार जरी केला तरी account पुन्हा active करता येतं.
डॉर्मंट Account मधून पैसे काढायचे असतील, तर काय करावं लागेल?
जर तुमचं बँक account dormant झालं असेल आणि त्यातून पैसे काढायचे असतील, तर सर्वप्रथम ते account reactivate करणं गरजेचं आहे.त्यासाठी जवळच्या शाखेत जावं लागेल, identity proof (जसं की Aadhaar, PAN) आणि updated KYC documents घेऊन.बँकेमध्ये एक application द्यावी लागते dormant account चालू करण्यासाठी.एकदा account चालू झालं, की तुम्ही ATM, Net Banking किंवा थेट बँकेत जाऊन सहज पैसे काढू शकता.
निष्कर्ष
Saving Account Dormant असेल, तर योजना DBT पेमेंट येणं थांबतं – हे खरं.
पण ही अडचण कायमची नाही. तुम्ही बँकेत जाऊन फॉर्म भरून, KYC देऊन आणि एक व्यवहार करून खातं active करू शकता.
एकदा खातं Active झालं की, योजना DBT पुढच्या हप्त्यांपासून नियमितपणे येऊ लागतात.

मी तुषार भगत, मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय योजना, लाभ व माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanawadi.com या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील — कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!