APAAR ID CARD म्हणजे Automated Permanent Academic Account Registry आयडी कार्ड हे भारत सरकारने संपूर्ण भारतातील शालेय विद्यार्थ्यांना एक नवीन युनिक आयडी क्रमांक मिळावा यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने ओळखपत्र म्हणून APAAR आयडी कार्ड लाँच केले. 2020 च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे केंद्र सरकारच्या ‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी आयडी’ उपक्रमाचा हा एक भाग आहे तसेच APAAR आयडी कार्ड ला (एक देश, एक विद्यार्थी ओळख ) One Nation One Student Id Card म्हणूनही ओळखले जातात
The APAAR ID card provides a centralized platform for all your academic information. Register for the APAAR ID card today and enjoy the benefits of One Nation One Student ID with easy APAAR ID registration & APAAR ID Login to track your education.
APAAR ID CARD म्हणजे काय?
APAAR ID CARD म्हणजे Automated Permanent Academic Account Registry आयडी कार्ड हे भारत सरकारने संपूर्ण भारतातील शालेय विद्यार्थ्यांना एक नवीन युनिक आयडी क्रमांक मिळावा यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने ओळखपत्र म्हणून APAAR आयडी कार्ड लाँच केले. APAAR आयडी कार्ड ला (एक देश, एक विद्यार्थी ओळख ) One Nation One Student Id Card म्हणूनही ओळखले जातात आता आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12-अंकी अपार कार्ड (Automated Permanent Academic Account Registry) तयार केले जाणार आहे. या कार्डामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तपशील आणि इतर महत्त्वपूर्ण नोंदी समाविष्ट केल्या जातील. हे कार्ड ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी‘ या संकल्पनेनुसार विकसित करण्यात आले असून, शैक्षणिक व्यवस्थापन अधिक सुलभ आणि केंद्रीकृत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
APAAR ID CARD चा उद्देश काय आहे? विद्यार्थ्यांसाठी कसं फायदेशीर आहे ?
प्रत्येक विद्यार्थ्याला आजीवन APAAR आयडी दिला जाईल,APAAR डिजीलॉकरचा एक सोपा डिजिटल प्रवेशद्वार असेल ज्यामुळे पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत त्यांचा शैक्षणिक प्रवास सहज ट्रॅक करता येईल. हा आयडी विद्यार्थ्यांसाठी, शाळांसाठी आणि सरकारसाठी उपयोगी ठरेल.
- डिजिलॉकर App च्या मदतीने विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपात त्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज आणि यश, जसे की परीक्षेचे निकाल आणि रिपोर्ट कार्ड ( Save) करू शकतात आणि सहज कधीही डाउनलोड करून उपयोगात आणू शकता .
- APAAR आयडी कार्ड चे उद्दिष्ट बनावट प्रमाणपत्रे रोखणे आणि शाळांना विश्वासार्ह माहिती देण
विद्यार्थ्याना APAAR ID registration & APAAR ID Login कसं करावा ?
APAAR ID registration online Login:
APAAR आयडी तयार करण्यासाठी, आपल्याला अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल @ apaar.education.gov.in. यासाठी, आधी DigiLocker मध्ये खाते तयार करणे आवश्यक आहे. APAAR आयडी फक्त U Dice पोर्टलवर तयार केला जाईल. केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना हा आयडी दिला जात आहे. पालकांनी संमतीपत्र दिल्यावरच आयडी मिळेल. APAAR आयडीसाठी पालकांनी शाळेशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांची नाव, जन्मतारीख आणि आधार तपासणी आवश्यक आहे.
APAAR ID registration अपार आयडी नोंदणी कसं करावा?
- apaar.education.gov.in. या वेबसाइटवर जा.”Create your APAAR” वर क्लिक करा.
- जर तुमच्याकडे प्रॉव्हिजनल नंबर नसेल, तर “Create New” निवडा.
- विद्यार्थ्याचा आधार नंबर टाका.
- आधार नोंदणी केलेल्या फोन नंबरवर आलेला OTP टाका.
- “New user sign up” निवडा.
- मोबाइल नंबर टाका आणि OTP जनरेट करा.
- नाव, यूजरनेम, पिन, कन्फर्म पिन टाका आणि सत्यापित करा.
आधार प्रमाणीकरण करा.शैक्षणिक तपशील भरा.फॉर्म सबमिट करा.लॉगिनसाठी यूजरनेम आणि पिन लक्षात ठेवा.
APAAR ID Login अपार आयडी लॉगिन कसं करावा?
APAAR ID Login: लॉगिन करणे सोपे आहे. नोंदणी केल्यानंतर, आपल्याला कधीही पोर्टलमध्ये लॉगिन करता येईल. नोंदणी करताना वापरलेला मोबाइल नंबर, यूजरनेम आणि पिन लॉगिनसाठी वापरला जाऊ शकतो.
- अधिकृत वेबसाइटवर जा.
- “Create Your APAAR” वर क्लिक करा.
- १२ अंकी प्रॉव्हिजनल नंबर टाका.
- “Submit” क्लिक करा.
- शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC बँक) वेबसाइटवर लॉग इन करा
- डॅशबोर्डवर APAAR कार्ड डाउनलोड पर्याय शोधा आणि निवडा.
- APAAR कार्ड स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- डाउनलोड किंवा प्रिंट पर्याय निवडा.
- APAAR कार्ड डाउनलोड केले जाईल.
🔴 हेही वाचा 👉 सुवर्णसंधी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ नोंदणी – Gharelu Kamgar Yojana Online Application 2024
APAAR आयडीचे विद्यार्थ्यांसाठी फायदे काय आहे?
- आजीवन ओळख: APAAR आयडी विद्यार्थ्यांसाठी कायमचा ओळख क्रमांक आहे, ज्यामुळे शैक्षणिक प्रगती ट्रॅक करणे सोपे होते.
- शैक्षणिक नोंदी: शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक स्तरांवरील नोंदी एकाच ठिकाणी साठवली जातात.
- सर्व माहिती एकत्र: निकाल, रिपोर्ट कार्ड, आरोग्य तपशील आणि क्रीडा माहिती एकाच कार्डवर असते.
- सोयीचे शिक्षण: विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालय बदलताना त्यांची सर्व माहिती सोप्या पद्धतीने ट्रान्सफर करता येते.
- ऑनलाइन अपडेट: शिष्यवृत्ती, पुरस्कार आणि क्रेडिट्स थेट बँकेत नोंदवले जातात.
- सरकारची मदत: विद्यार्थ्यांचा मागोवा ठेवून सरकार त्यांना शैक्षणिक संधी देऊ शकते.
APAAR आयडी कार्ड विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित आणि सोयीस्कर ओळख आहे.
पोर्टल | लिंक |
नोंदणी पोर्टल | https://www.abc.gov.in/ and https://apaar.education.gov.in/ |
डिजी लॉकर पोर्टल | digilocker.gov.in |