Namo Shetkari Yojana : २०१९ मध्ये केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती, ज्याद्वारे शेतकऱ्यांना वर्षातून ६ हजार रुपये देण्यात येतात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. त्याचप्रमाणे, २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी योजना’ लागू केली. या योजनेत शेतकऱ्यांना देखील ६ हजार रुपये दिले जातात. यामुळे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा फायदा होतो.
Namo Shetkari Yojana 6th Installment
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेचा ६वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जारी होण्याची अपेक्षा आहे. या हप्त्यात छोटे आणि कष्टक शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चासाठी मदत मिळेल, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. पैसे थेट शेतकऱ्यांच्या आधार-लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जातील. शेतकऱ्यांना हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी, जमीन पडताळणी, आणि बँक खातं आधारशी लिंक करणं आवश्यक आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक लोड कमी करणे, उत्पादन क्षमता वाढवणे आणि शाश्वत शेती पद्धतीला प्रोत्साहन देणे आहे.
Namo Shetkari Yojana 6th Installment : Feb/March 2025

पी एम किसान सम्मान निधी योजनेचे ६,००० रुपये तसेच नमो शेतकरी योजनेचे ६,००० रुपये असे एकूण १२,००० रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.याच्या सोबतच, शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये शेती विमा मिळतो, ज्यामुळे त्यांच्या शेतमालाचे संरक्षण केले जाते. आतापर्यंत, ६९०० कोटी रुपये शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ झाले आहेत.The 6th installment of Namo Shetkari Yojana will be released in 2025 to provide financial assistance to small and marginal farmers for agricultural expenses. Farmers must complete E-KYC, Aadhaar linking, and land verification to receive the payment.
Installment Number | Date |
---|---|
1st Installment | July 27, 2023 |
2nd Installment | November 15, 2023 |
3rd Installment | February 28, 2024 |
4th Installment | June 18, 2024 |
5th Installment | October 5, 2024 |
6th Installment | February 2025 (Expected) |
Namo Shetkari Beneficiary Status, List Check कसे करावे ते बघूया ?
नमो शेतकरी योजना चे लाभार्थी स्थिती कशी तपासावी?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत तीन हप्त्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते. यापूर्वी पाच हप्ते जाहीर करण्यात आले आहेत. चौथ्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी, खाली दिलेल्या पद्धतींनुसार काम करा:
- अधिकृत वेबसाइटवर जा
सर्वप्रथम nsmny.mahait.org या वेबसाइटला भेट द्या. - लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा
वेबसाइटवर “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा. - तुमचा नंबर भरा
तुमचा मोबाइल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर मध्ये एक निवडा आणि संबंधित नंबर टाका. - Captcha आणि OTP टाका
स्क्रीनवर दिसणार्या Captcha कोडला योग्यरित्या भरून, “Get Mobile OTP” वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल. तो OTP भरून “Submit” करा.
नमो शेतकरी योजनेच्या कोणत्याही माहिती , अधिकृत वेबसाइट, बातम्या, अपडेट्स मिळवण्यासाठी Whatsapp ग्रुप चे सदस्य व्हा.


मी तुषार भगत, मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय योजना, लाभ व माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanawadi.com या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील — कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!