Girl Child Fixed Deposit Scheme Maharashtra ही योजना नेमकी आहे तरी काय? मुलीच्या भविष्याची आर्थिक तरतूद तयार व्हावी.Girl Child Fixed Deposit Scheme ही MAHABOCW (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) अंतर्गत राबवली जाणारी एक सशक्त योजना आहे.
योजनेचा उद्देश म्हणजे – पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन (Tubectomy) केलेल्या महिलेला ₹1,00,000 ची आर्थिक सुरक्षितता मिळावी ज्या महिला बांधकाम कामगारांनी MAHABOCW.in वर नोंदणी केली आहे, त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर ₹1,00,000 ची फिक्स डिपॉझिट (FD) मुलीच्या भविष्यासाठी केली जाते.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्य
- ₹1,00,000 ची रक्कम फिक्स डिपॉझिट स्वरूपात मंजूर केली जाते
- ही रक्कम कामगार महिलेच्या किंवा तिच्या मुलीच्या नावावर जमा केली जाते
- या डिपॉझिटवर मिळणारे व्याज भविष्यात मुलीच्या शिक्षण, आरोग्य किंवा विवाहासाठी वापरता येते
कोण पात्र आहे?
✓अर्जदार बांधकाम महिला कामगार असावी
✓ती MBOCWW मध्ये वैध नोंदणीकृत असावी
✓Smart Card कमीतकमी 1 वर्ष जुना असावा
✓पहिली मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन झालेले असावे (Tubectomy)
✓ऑपरेशन सरकारी रुग्णालयात झालेले असावे
✓ मुलीचा जन्म नंतरचा दाखला आवश्यक आहे
लागणारी कागदपत्रं
- MBOCWW Smart Card आणि नोंदणी क्रमांक
- मुलीचा जन्म दाखला
- कुटुंब नियोजन ऑपरेशन रिपोर्ट (Govt Hospital)
- आधार कार्ड (कामगार महिला व मुलीचे)
- बँक पासबुक कॉपी
- पासपोर्ट फोटो
- शपथपत्र (मुलगी पहिली आहे हे नमूद करणारे)
- अर्जाचा अधिकृत फॉर्म (C01 / S05) – mahabocw.in/download
अर्ज कसा करावा?
सध्या या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुविधा उपलब्ध नाही
अर्ज MBOCWW जिल्हा कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन ऑफलाइन करावा लागतो

प्रक्रिया:
- mahabocw.in वरून संबंधित फॉर्म डाउनलोड करा
- सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रं जोडून सबमिट करा
- कार्यालयाकडून पावती व स्वीकारपत्र मिळवा
- अर्जाची तपासणी झाल्यावर ₹1,00,000 ची फिक्स डिपॉझिट मंजूर केली जाते
योजना 2025 मध्ये सुरू आहे का?
होय. ही योजना 2025 मध्ये देखील संपूर्ण राज्यात सक्रिय आहे.
अनेक जिल्ह्यांतील महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे.
BOCW च्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात फॉर्म व मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत.
या योजनेचा नेमका फायदा काय?
- मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी भविष्यात उपयोगी येणारी आर्थिक शाश्वतता
- महिला बांधकाम कामगारासाठी कुटुंब नियोजन केल्याबद्दल सरकारकडून सन्मान व आर्थिक सवलत
- सामाजिक समत्व व कन्या संर्वधनाचा ठोस पाऊल
काही महत्वाचे मुद्दे
- ऑपरेशन केल्यानंतर 6 महिन्यांच्या आत अर्ज करणं बंधनकारक
- अर्ज करताना सर्व कागदपत्रं संपूर्ण व अचूक असावीत
- ही योजना फक्त पहिल्या मुलीच्या जन्मानंतरच लागू होते
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जातो
या योजनेत पैसे कधी दिले जातात?
फिक्स डिपॉझिट केलेली रक्कम मुलगी 18 वर्षांची झाल्यावर, योग्य कागदपत्रांच्या आधारे तिच्या बँक खात्यात थेट DBT पद्धतीने जमा केली जाते. हे पैसे शिक्षण, लग्न, किंवा उद्योजकता यासाठी वापरता येतात.
MBOCWW ची ही Girl Child Fixed Deposit Scheme म्हणजे नक्की काय आहे?
हे MBOCWW मंडळाचं एक विशेष पाऊल आहे. ज्या बांधकाम महिला कामगारांची पहिली मुलगी होते, तिच्या नावाने ₹1,00,000 ची फिक्स डिपॉझिट केली जाते – अगदी थेट तिच्या भविष्यासाठी!
कोण अर्ज करू शकतं या MBOCWW FD योजनेसाठी?
जर तुम्ही MBOCWW मध्ये नोंदणीकृत महिला बांधकाम कामगार असाल, आणि तुमचं कुटुंब नियोजन झालंय (surgery प्रमाणपत्र), तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर तुम्ही या Girl Child Fixed Deposit Scheme साठी पात्र आहात.
Girl Child Fixed Deposit Scheme चा खरा फायदा काय?
आजच्या काळात मुलींचं भविष्य सुरक्षित करणं हे फार गरजेचं आहे. MBOCWW ची ही योजना केवळ रक्कम देत नाही, ती एका मुलीला आत्मनिर्भर बनवण्याचं बीज पेरते.
₹1 लाख फिक्स डिपॉझिट कोणाच्या नावावर आणि कधी मिळेल?
ही रक्कम थेट मुलीच्या नावावर फिक्स केली जाते. ती 18 वर्षांची झाल्यावर MBOCWW मंडळ तिच्या खात्यात DBT पद्धतीने ही रक्कम ट्रान्सफर करतं.
What is Sukanya ₹1000 per month?
ही योजना म्हणजे सरकारकडून मुलीसाठी future ready saving. जर दर महिन्याला ₹1000 भरलं, तर 15 वर्षात मोठा फंड तयार होतो – थेट 7.6% व्याजाने. 21 वर्षानंतर maturity आणि मुलीच्या higher education किंवा लग्नासाठी वापर करता येतो. Simple, safe, आणि trust government backed.
What is the best scheme for a girl child?
बेस्ट स्कीम म्हणजे जिथे risk नाही, फायदा मोठा. Sukanya Yojana सर्वसामान्यांसाठी आणि MBOCWW FD Scheme बांधकाम महिला कामगारांसाठी बेस्ट. एकात दरमहा भरावं लागतं, दुसऱ्यात सरकारचं थेट ₹1 लाख FD मुलीच्या नावावर. तुमची पात्रता काय, त्यावर निर्भर आहे.
मुलींसाठी कोणता FD सर्वोत्तम आहे?
जर तुमचं उद्दिष्ट long term growth + security असेल तर Sukanya FD.
पण जर कामगार महिला असाल आणि registered असाल, तर MBOCWW चा ₹1 लाख FD ही scheme एकदम jackpot आहे. नोंदणी, कागदपत्रं, GR फॉलो केली की सरकार FD करतं – थेट खात्यात.
सुकन्या 1000 प्रति महिना म्हणजे काय?
ही योजना म्हणजे तुमच्या लेकीसाठी future ready saving plan. फक्त ₹1000 दरमहा भरून, तुम्ही तिच्या 18व्या वाढदिवसाला एक मोठा support तयार करता. हे पैसे सरकारी गॅरंटीमध्ये गुंतवले जातात आणि एका fixed व्याज दराने वाढतात. मुलगी 18 वर्षांची झाली की, शिक्षण किंवा लग्नासाठी हे पैसे वापरता येतात. ही योजना फक्त मुलींसाठी असून, तिच्या नावावर खाते उघडावं लागतं.
निष्कर्ष
MAHABOCW च्या Girl Child Fixed Deposit Scheme 2025 ही फक्त एक आर्थिक मदत योजना नाही – तर महिलांच्या सामाजिक सशक्ततेचं आणि मुलींच्या भविष्याचा आधार देणारी योजना आहे.
जर तू बांधकाम क्षेत्रातील महिला कामगार असशील आणि तुझ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केलं असेल – तर ही संधी नक्कीच

मी तुषार भगत, मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय योजना, लाभ व माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanawadi.com या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील — कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!