लाडकी बहीण योजना Majhi Ladki Bahin Yojana Latest News 2024 अंतर्गत चौथ्या टप्प्यात 2 कोटी 22 लाख महिलांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत. जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला असेल, परंतु तुमच्या बँक खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नसेल, तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची माहिती आहे.
महत्वाची सूचना:
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्यास, तुमचे आधार कार्ड बँक खात्यासोबत अद्ययावत करा. आधार लिंक केल्यावर, तुम्हाला 3 दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे मिळतील.
चौथ्या टप्प्यातील रक्कम-Majhi Ladki Bahin Yojana Latest News 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा केले जातील. 5 ऑक्टोबरपासून या योजनेच्या पैशांचे वितरण सुरू झाले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 5 ऑक्टोबर रोजी 2 कोटी 22 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती दिली.
तुमचे पैसे अजून आले नाहीत का?(माझी लाडकी बहीण योजना)-Majhi Ladki Bahin Yojana Latest News 2024
जर तुमचा माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला असेल आणि तुमच्या खात्यात पैसे आलेले नसलें, तर त्वरित तुमचे आधार कार्ड अपडेट करा.
- आधार कार्ड अद्ययावत करा: तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे.
- 3 दिवसांत पैसे जमा: आधार लिंक झाल्यावर, तुमच्या बँक खात्यात 3 दिवसांच्या आत तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होईल.